उकडीचे मोदक

Go down

उकडीचे मोदक  Empty उकडीचे मोदक

Post  Admin on Wed 29 Jun 2011, 8:29 pm

उकडीचे मोदक  51857311
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सगळे उत्सुक आहेत...तेव्हा त्यांना सगळ्यात प्रिय (आणि मला सुद्द्धा ) असलेले उकडीचे मोदक कसे करतात ते आपण बघूया...साधारणतः प्रत्येक घराची हे मोदक करायची एक विशिष्ठ पद्धत असते...आणि प्रत्येक घरातली "आई" हि मास्तर शेफ असते...तरीही माझ्यासारखे "शिकाऊ" उमेदवार कोणी असतील तर त्याच्यासाठी ही रेसिपी :

साहित्य : एक वाटी स्वच्छ तांदूळ धुऊन, सावलीत वाळवून, दळून चाळलेली पिठी, एक वाटी (साखर + गूळ), एक नारळ, चार चमचे तूप, वेलची पूड, तेल, आवडत असल्यास भाजून कुटलेली अर्धी वाटी खसखस पूड.

सारण: खोवलेल्या नारळाच्या चवात साखर आणि गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवावे. शिजत असताना मधून मधून हलवावे व भांड्‍याच्या तळाला चिकटू देऊ नये (वाटल्यास एक चमचा तूप टाकावे). शिजत आल्यावर त्यात चमचाभर तांदळाची पिठी व खसखस पूड घालावी. वेलची पूड घालून हलवून सारण सारखे करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे.

उकड : जितकी तांदळाची पिठी, तितकेच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेवून त्यात पिठी घालून हलवावे. झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. आचेवरुन खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्याइतपत झाल्यानंतर तेलपाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मउसर ठेवावे.

मोदक : या उकडीचे लहान गोळे करून त्याची हाताने पारी बनवावी. वाटीचा आकार देवून त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक आणावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, सात किंवा नउ अशा पाडाव्यात. (शिकाऊ उमेदवारांनी साच्याचा वापर करावा) हे तयार केलेले मोदक एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडे तुपाचे बोट लावून उकडायला ठेवावे (१०-१५ मीन. ). आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खाण्‍यास द्यावे.

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum