CKP
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
Latest topics
» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?
गुढी पाडवा EmptyMon 30 Jul 2012, 12:44 pm by Admin

»  आयुर्वेद:कोहळा
गुढी पाडवा EmptySat 26 Nov 2011, 2:28 pm by Admin

» आयुर्वेद आवळा
गुढी पाडवा EmptySat 12 Nov 2011, 1:30 pm by Admin

» आयुर्वेद: तुळस
गुढी पाडवा EmptyThu 10 Nov 2011, 9:49 pm by Admin

» CKP Fish Curry
गुढी पाडवा EmptyTue 12 Jul 2011, 4:31 pm by Admin

» Difference between GOTRA system of Kayastha and Brahmins
गुढी पाडवा EmptyFri 08 Jul 2011, 8:01 pm by चिंतातुरपंत धडपडे

» Various Origins of CKP's
गुढी पाडवा EmptyFri 08 Jul 2011, 3:01 pm by Admin

» मन एव मनुष्याणाम्‌
गुढी पाडवा EmptyThu 07 Jul 2011, 8:26 pm by चिंतातुरपंत धडपडे

» CKP आडनावे
गुढी पाडवा EmptySat 02 Jul 2011, 2:16 pm by Admin

Counter
free hit counters
todaypowerstoneyesterdaycounter

गुढी पाडवा

Go down

गुढी पाडवा Empty गुढी पाडवा

Post  Admin Fri 25 Mar 2011, 11:55 am

गुढी पाडवा
महाराष्ट्रात हिंदून परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो. या महिन्याची पहिली तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्षप्रतिपदा मानली जाते. ‘प्रतिपदा’ या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत ‘पाडवा’ हा शब्द रुढ झाला. वसंतऋतूचे आगमन आणि नव्या नव्या वर्षाचा प्रारंभ म्हणून ‘चैत्री पाडवा’ साजरा होतो. या दिवशी गुढ्या. तोरणे उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला ‘गुढी पाडवा’ असे संबोधले जाते.
चैत्र शुद्ध प्रतिपदेस हे नाव आहे. या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात व भारताच्या इतर भागात नूतन वर्षारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेस होतो.
भारतीय संस्कॄतीमध्ये सण-उत्सवांच्या परंपरांना कालचक्रानुसार होणाऱ्या ऋतुबदलांचेही परिणाम लाभलेले आहे. शिशिरानंतर वसंतऋतूचे आगमन होते. झाडांना नवीन पालवी फुटते, नवा बहर येतो. उत्साहाचे नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. असा हा आनंददायी ऋतूबदल चैत्र महिन्यात घडतो. म्हणून तर झाडांना फुटलेल्या नव्या पालवीला ‘चैत्रपालवी’ म्हणतात, पूर्वीच्या काळी चैत्र महिन्याला ‘मधुमास’ म्हणत; या नावावरूनच या ऋतूचा या महिन्याचा गोडवा ध्यानात यावा.

आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.या दिवशी काही धार्मिक विधीही सांगितले आहेत.

घरातील सर्वजण तैलाभ्यंण करून उष्णोदकाने स्नान करतात. नंतर कडुलिंबाची पाने भक्षण करतात. कळकाच्या काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधून त्यावर चांदीचे किंवा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाचे टाळे व फुलांची माळ बांधून दारात तो ध्वज अर्थात गुढी उभारण्याचा पाडवा म्हणूनच याला ‘गुढीपाडवा’ असे म्हणतात. दुपारी मिष्टान्नाचे भोजन करतात. उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफळ श्रवण करतात. गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक माना आहे.

महत्व
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी. नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी, असे सांगितले आहे. तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधार्‍यांना वंदन करावे, असेही सांगितले आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असले त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे मंगळवारी सुरु होत असल्यामुळे मंगळ हा या वर्षाचा अधिपती असे समजले पाहिजे. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.

पूर्वापार श्रद्धा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. अशी विविध प्रकारांनी संवत्सरांची विभागणी आणि मांडणी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे.

विशेष:
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पृथ्वी स्वतःभोवती एका दिवसात एक गिरकी घेते व सूर्याभोवती वर्षात एक फेरी मारते आणि चंद्र पृथ्वीला महिन्यात एक प्रदक्षिणा घालतो हे आता आपल्याला माहीत आहे. पण मुळात पृथ्वीच्या गिरकी घेण्याच्या कालावधीवरून दिवस ठरला, चंद्राच्या भ्रमणावरून सुमारे तीस दिवसांचा महिना आणि पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे बारा महिन्यांचे एक वर्ष ठरले गेले हे कदाचित सर्वांना ठाऊक नसते. आपण स्वतःच पृथ्वीच्या सोबत फिरत असल्यामुळे तिचा वेग आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही. विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर आपल्या बुध्दीला त्याचे आकलन होते.

पूर्वीच्या काळात वेगळी परिस्थिती होती. नजरेच्या टप्याच्या पलीकडे जमीन पसरलेली दिसते, क्षितिजावर दिसणा-या जागेकडे जातांना ते क्षितिजच पुढे पुढे सरकतांना दिसते. त्यामुळे जगाला कोठे अंत असणार नाही असे वाटते. भूकंपासारखे क्वचित येणारे प्रसंग सोडले तर एरवी धरती आपणा सर्वांना भक्कम आधार देते. तिच्या आधाराने आपली घरे आणि झाडे उभी असतात हे पाहिल्यावर पृथ्वी ही विपुला आणि अचला आहे अशी दृढ खात्री सर्वांना वाटत होती. तिचे असेच उल्लेख प्राचीन साहित्यात दिसतात. रोज सकाळी पूर्वेला उगवून व संपूर्ण आभाळाला पार करून संध्याकाळी पश्चिमेला मावळतांना प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणारा तेजस्वी पण आकाराने एकाद्या चेंडूएवढाच दिसणारा सूर्य विपुला पृथ्वीच्याही कोट्यवधी पटीने विशाल असेल आणि तो जागचा हलतही नसेल हे कुणालाही पटण्यासारखे नव्हते. क्वचित कोणा विद्वानांच्या मनात असे विचार आले असले तरी ते इतर विद्वज्जनांना मान्य होत नसत. जनसामान्य तर अशी कल्पनासुध्दा करू शकत नव्हते. त्यामुळे आभाळात चाललेल्या घडामोडी इथून आपल्याला कशा दिसतात याच्या आधारावरच खगोलशास्त्र निर्माण झाले, त्याचा अभ्यास होत गेला आणि अजून होत आहे. त्यात आढळलेल्या नियमित पुनरावृत्तीवरून कालगणना करण्याचे अद्भुत असे शास्त्र त्यातून तयार केले गेले.

अमावास्येला चंद्राचे अदृष्य होणे, त्यानंतर प्रतिपदेपासून कलेकलेने वाढत जात पौर्णिमेला त्याचे पूर्णबिंब दिसणे आणि त्यानंतर पुन्हा कलेकलेने लहान होत अमावास्येला गायब होणे हे चक्र सतत नियमितपणे चाललेले असते. या चक्राच्या कालावधीला ' महिना' असे नांव दिले गेले. प्रत्यक्षात तो कालावधी सुमारे
साडेएकोणतीस दिवसांचा असतो. त्यामुळे आपल्या पंचांगातला महिना कधी तीस दिवसांचा तर कधी एकोणतीस दिवसांचा येतो. सुमारे ३५४ दिवसांत असे बारा महिने उलटून एक वर्ष संपते. सूर्य मावळताच आकाशात तारका दिसायला लागलेल्या असतात, पण चंद्र मात्र रोजच आदल्या दिवसाहून दोन घटिका उशीराने उगवतो. त्यामुळे आदल्या रात्री ज्या तारका त्याच्या आजूबाजूला होत्या त्या दुसरे दिवशी पश्चिमेकडे सरकल्या असतात व आदल्या दिवशी ज्या तारका त्याच्या मागे होत्या त्या आता त्याच्या सोबतीला आलेल्या दिसतात. असे करता करता सत्तावीस दिवसांनंतर सुरुवातीला त्याच्यासोबत असलेल्या तारका पुन्हा त्याच्या आसपास असतात. या सत्तीस तारकापुंजांना अश्विनी, भरणी वगैरे नांवे दिली गेली. तसेच त्यांना नक्षत्र म्हणण्यात आले. त्याचप्रमाणे त्याच तारकांचे बारा समान आकाराचे पुंज करून त्यांना राशी असे नांव दिले गेले. या नक्षत्र व राशींच्या संदर्भात सूर्य, चंद्र, शनी, मंगळ आदी ग्रहगोलांचे निरीक्षण करणे सोयीचे झाले. सर्व सत्तावीस नक्षत्रांतून फिरून चंद्र सत्तावीस दिवसात परत आलेला असतो, त्यामुळे अमावास्येपर्यंत तो आणखी पुढे सरकतो आणि रोज नक्षत्र बदलत प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री वेगळ्या नक्षत्रात असतो. वर्षाच्या पहिल्या महिन्यात तो चित्रा नक्षत्रात असतो म्हणून तो चैत्र महिना आणि पुढल्या महिन्यात विशाखा नक्षत्रात असतो म्हणून वैशाख महिना अशी बारा महिन्यांची नांवे पडली.

सूर्याला कला नसतात, पण दिवस आणि रात्री सतत सहा महिने लहान लहान किंवा मोठ्या मोठ्या होत जातात, त्याचे एक चक्र असते, ते सुमारे ३६५ दिवसांचे असते. ते एक वर्ष धरले जाते. सूर्य आभाळात तळपत असतांना तेथे कोणत्याही चांदण्या दिसू शकत नाहीत, पण सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर
अंधार पडल्यावर केलेल्या निरीक्षणावरून तो कोणत्या राशीत आहे ते समजते. एका राशीतून पूर्ण प्रवास करून पुढील राशीत जायला सूर्याला तीस ते एकतीस दिवस लागतात. त्या कालावधीलाही महिना असे नांव दिले गेले. अशा बारा महिन्यांचे चक्र सुमारे ३६५ दिवसांचे असते. जेंव्हा चंद्र आपल्या चक्रातून बारा वेळा फिरून आलेला असतो तेंव्हा ३५४ दिवस झालेले असतात, पण सूर्याला आपल्या पूर्वीच्या जागेवर यायला अजून ११ दिवस लागतात. तोपर्यंत चंद्राच्या पुढील महिन्याचे अकरा दिवस झालेले असतात. पाश्चात्य देशात सुमारे ३६५ दिवसांचे सौर वर्ष पाळले जाते ते पूर्णपणे सूर्याच्या स्थितीवरच आधारलेले असते. त्याचा चंद्राशी कांही संबंध नसल्यामुळे कोणत्याही तारखेला पौर्णिमा, अमावास्या किंवा इतर कोणतीही तिथी येऊ शकते. दिवसांचे लहान व मोठे होत जाणे हे मात्र तारखेप्रमाणेच ठरत असल्यामुळे वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस ठरलेले आहेत. ते अनुक्रमे जून आणि डिसेंबर या महिन्यातच ठरलेल्या तारखेला येतात. उन्हाळा व हिवाळा या गोष्टी सूर्यप्रकाशामुळे घडत असल्यामुळे पाश्चात्य कॅलेंडरप्रमाणे त्या ठराविक महिन्यात येतात. पण भारतीय पंचांगातले महिने थोडे आगे मागे होत राहतात. चंद्र आणि सूर्य यांच्या निरीक्षणावर आधारलेल्या कालावधीत फार जास्त अंतर पडू नये
यासाठी भारतीय पध्दतीत दर तीन वर्षात एक अधिक महिना पाळला जातो. तरीही या वर्षीचा गुढी पाडवा सहा एप्रिलला आला असला तरी पुढील वर्षी तो याच तारखेला कधीच येणार नाही. ज्या वर्षात अधिक मास नसतो त्या वर्षानंतर तो त्या तारखेच्या दहा दिवस आधी येतो आणि जर त्या वर्षात अधिकमास असेल त्यानंतरच्या वर्षात तो वीस दिवस उशीराने येतो.

या अनिश्चिततेमुळे पंचांगातील महिने व निसर्गातील ऋतु यात फरक येतो. दुसरी गोष्ट अशी आहे की वर्षातले सहा ऋतु मानले असले तरी प्रत्येकाचा नैसर्गिक कालावधी समानच असण्याचे कारण नाही. सर्वसाधारणपणे उन्हाळा आणि हिवाळा हे प्रमुख ऋतू जास्त काळ जाणवत राहतात आणि वसंत किंवा शरदासारखे हवानामात बदल घडवून आणणारे दिवस थोडेच असतात. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक जागी वेगवेगळे हवामान असते. उत्तरेकडील युरोप खंडात कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे त्यांना उन्हाळा अत्यंत सुखावह वाटतो आणि उन्हाळ्याची नुसती चाहूल देणारा वसंतसुध्दा त्यांना स्वागतार्ह वाटतो. मुंबईमध्ये प्रचंड उकाड्यामुळे उन्हाळा अगदी नकोसा वाटतो आणि गुलाबी थंडीचा शिशिर ऋतूच छान वाटतो. तो संपून वसंत सुरू होताच आनंद होण्यापेक्षा येणा-या उकाड्याची चाहूल जास्त अस्वस्थ करते. किनारपट्टी सोडल्यास महाराष्ट्राच्या इतर भागात मात्र वसंत ऋतू बहरलेला जाणवतो.

ऋतूनुसार सणवार ठरवतांना भारतातील वेगवेगळ्या भागांचा विचार केला जात असल्यामुळे स्थानिक हवामानाप्रमाणे त्यांना कमी अधिक महत्व मिळत जाते. उत्तरेकडील पंजाबमध्ये बैसाखी अधिक लोकप्रिय होते तर महाराष्ट्रात दसरा आणि दिवाळी. तरीही गुढी पाडव्यालासुध्दा त्याचे म्हणहून महत्व आहेच!

संदर्भ :-
http://anandghan.blogspot.com

Share this page

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum