CKP
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
Latest topics
» कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?
प्राचीन कालगणना EmptyMon 30 Jul 2012, 12:44 pm by Admin

»  आयुर्वेद:कोहळा
प्राचीन कालगणना EmptySat 26 Nov 2011, 2:28 pm by Admin

» आयुर्वेद आवळा
प्राचीन कालगणना EmptySat 12 Nov 2011, 1:30 pm by Admin

» आयुर्वेद: तुळस
प्राचीन कालगणना EmptyThu 10 Nov 2011, 9:49 pm by Admin

» CKP Fish Curry
प्राचीन कालगणना EmptyTue 12 Jul 2011, 4:31 pm by Admin

» Difference between GOTRA system of Kayastha and Brahmins
प्राचीन कालगणना EmptyFri 08 Jul 2011, 8:01 pm by चिंतातुरपंत धडपडे

» Various Origins of CKP's
प्राचीन कालगणना EmptyFri 08 Jul 2011, 3:01 pm by Admin

» मन एव मनुष्याणाम्‌
प्राचीन कालगणना EmptyThu 07 Jul 2011, 8:26 pm by चिंतातुरपंत धडपडे

» CKP आडनावे
प्राचीन कालगणना EmptySat 02 Jul 2011, 2:16 pm by Admin

Counter
free hit counters
todaypowerstoneyesterdaycounter

प्राचीन कालगणना

Go down

प्राचीन कालगणना Empty प्राचीन कालगणना

Post  Admin Fri 25 Mar 2011, 2:25 pm

अजून एका वर्ष काळाच्या पडद्याआड होत आहे. आज आपल्याकडे काळ मोजण्याची घडाळ्यासारखी अचूक साधने उपलब्ध आहेत. प्राचीन काळी अशी कुठलीच साधने नव्हती. तरीही प्राचीन ऋषीमुनींनी कालमान मोजण्याची परिभाषा विकसित केली होती. आज आपल्याला त्यांची परिमाणे अगदीच जुनीपुराणी वाटतील पण आजच्यासारखी कोणतीही वैज्ञानिक साधने उपलब्ध नसताना त्यांनी कालमापन करण्याचा केलेला प्रयत्न नक्कीच महत्वाचा आहे. या प्राचीन कालगणनेवर विश्वास ठेवायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कुतूहल किंवा गम्मत म्हणून तरी प्राचीन कालगणनेच्या नजरेतून जाणार्‍या वर्षाकडे पाहायला काहीच हरकत नाही. शिवपुराण आणि अन्य काही शास्त्रग्रंथांच्या आधारे ही कालगणना अशी आहे :

* डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो त्याला निमेष असे म्हणतात.
* पंधरा निमेषांची एका काष्टा होते.
* तीस काष्टा मिळून एक कला होते.
* तीस कलांचा एक मुहूर्त होतो.
* तीस मुहूर्त मिळून एक दिवस-रात्र होते.
* पंधरा दिवस-रात्रींचा एक पक्ष बनतो.
* दोन पक्ष मिळून एक महिना बनतो.
* माणसांचा एक महिना म्हणजे पितरांचा एक दिवस-रात्र बनतो. शुक्ल पक्ष म्हणजे पितरांचा दिवस आणि कृष्ण पक्ष म्हणजे पितरांची रात्र.
* सहा महीने मिळून एक आयन बनते.
* दोन आयन मिळून एक वर्ष बनते.
* माणसांच्या एका वर्षात देवतांचा एक दिवस-रात्र असतो. उत्तरायण म्हणजे देवतांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवतांची रात्र.
* माणसांची तीस वर्षे म्हणजे देवतांचा एक महिना आणि माणसांची 360 वर्षे म्हणजे देवतांचे एक वर्ष. या देवतांच्या वर्षाला दिव्य वर्ष असे म्हणतात.
* देवता वर्ष हे प्रमाण मानून युगांची कालगणना केली जाते.
* सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशी चार युगे मानली गेली आहेत.
* प्रत्येक युगाला संध्या आणि संध्यान्त असतो. संध्या म्हणजे युगाच्या पूर्वीचा काळ आणि संध्यांश म्हणजे युगाच्या शेवटचा काळ. म्हणजेच संध्या - मुख्य युग काल - संध्यांश असा क्रम असतो.
* सत्ययुगात 400 दिव्य वर्षांची संध्या, 4000 दिव्य वर्षांचे युग आणि 400 दिव्य वर्षांचा संध्यांश असतो.
* त्रेतायुगात 300 दिव्य वर्षांची संध्या, 3000 दिव्य वर्षांचे युग आणि 300 दिव्य वर्षांचा संध्यांश असतो.
* द्वापारयुगात 200 दिव्य वर्षांची संध्या, 2000 दिव्य वर्षांचे युग आणि 200 दिव्य वर्षांचा संध्यांश असतो.
* कलियुगात 100 दिव्य वर्षांची संध्या, 1000 दिव्य वर्षांचे युग आणि 100 दिव्य वर्षांचा संध्यांश असतो.
* चारी संध्या, युगकाळ आणि संध्यांश अशी मिळून 12,000 दिव्य वर्षे होतात.
* या चार युगांना चतुर्युग म्हणतात आणि अशी 1000 चतुर्युगे मिळून एक कल्प बनतो.
वरील दिव्य वर्षे जर मानवीय वर्षांमध्ये मोजली तर खालील प्रमाणे हिशोब होईल :

युग संध्या युगकाल संध्यांश एकूण
सत्य 144000 1440000 144000 1728000
त्रेता 108000 1080000 108000 1296000
द्वापार 72000 720000 72000 864000
कलि 36000 360000 36000 432000
चतुर्युगातील एकूण मानवीय वर्षे 4320000

* एका कल्पात चौदा मन्वंतरे असतात.
* एक मन्वंतर म्हणजे 71 चतुर्युगे.
* एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस-रात्र होतो.
* ब्रह्मदेवाच्या दिवसात सृष्टी उत्पन्न होते आणि रात्रीत ती लय पावते.
* या दिवसानुसार ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे असते.
* असे 1000 ब्रह्मदेव झाले की विष्णूची एक घटका होते.
* असे 1000 विष्णु झाले की रुद्राचा एक पळ होतो.
* असे 1000 रुद्र झाले की आदिमायेचा अर्थात महाशक्तीचा अर्धा पळ होतो.
जन्मलेल्या प्रत्येकाला मरण हे आहेच. काहींना लवकर तर काहींना विलंबाने एवढच. पण मृत्युंजय, महाकाल अर्थात परम शिव मात्र या सर्वांपलीकडे शाश्वत आणि अनंत असतो. त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही.
आता थोडा गोंधळात टाकणारा भाग. वर सांगितलेले उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र अनादी काळापासून सुरू आहे आणि अनंतापर्यंत सुरूच रहाणार आहे. म्हणजेच हे चक्र सुरू होण्याची विशिष्ट अशी वेळ नाही आणि विशिष्ट वेळी हे थांबेल असेही नाही. कल्पामागून कल्प असे हे चक्र अव्ह्याहतपणे सुरूच असणार आहे. सर्वसाधारण मानवी मनाला ही 'अनंताची' संकल्पना चटकन कळणारी नसली तरी ज्यांनी बराच काळ साधना केली आहे त्यांना काळ हा मनावर कसा अवलंबून असतो ते थोड्या अंशी तरी माहिती असेलच.

1 परम अणु -ज्याचे विभाजन होऊ शकत नाही व जो कोणत्याही प्रकारे दिसू शकत नाही.
२ परम अणु - १ अणु
३ अणु - १ त्रसरेणु (हा आपण पाहू शकतो)
३ त्रसरेणुंना सूर्यप्रकाश पार करतो तो काल - त्रुटि
३०० त्रुटि - १ बोध
३ बोध - १ लव
३ लव - १ निमेष
३ निमेष - १ क्षण
५ क्षण - १ काष्ठा
१५ काष्ठा - १ लघु
१५ लघु - १ घटी
२ घटी - १ मुहूर्त
५ ते ७ घटी - १ प्रहर
४ प्रहर - १ दिन
४ प्रहर - १ रात्र
८ प्रहर - १ अहोरात्र (अह: - दिन)
७ अहोरात्र - १ सप्ताह
१५ अहोरात्र - १ पक्ष (१ कृष्ण, १ शुक्ल)
२ पक्ष - १ मास (मास - महिना)
२ मास - १ ऋतु
३ ऋतु - १ अयन (१ उत्तरायण, १ दक्षिणायन)
१ उत्तरायण - देवांचा १ दिन
१ दक्षिणायन - देवांची १ रात्र
२ अयन - १ वर्ष (देवांची १ अहोरात्र)
देवांच्या ३६० अहोरात्री (माणसांची ३६० वर्षे) - १ देववर्ष (दिव्यवर्ष)
४००० दिव्यवर्ष (माणसांची ३६० X ४००० वर्षे) - १ सत्ययुग (कृतयुग)
संधि - ८०० दिव्यवर्ष (एक युग संपल्यानंतर दुसरे युग येण्यापूर्वीचा काल)
(माणसांची ३६० X ८०० वर्षे)
३००० दिव्यवर्ष ( माणसांची ३६० X ३००० वर्षे ) - १ त्रेतायुग
संधि - ६०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X ६०० वर्षे)
२००० दिव्यवर्ष (माणसांची ३६० X २००० वर्षे) - १ द्वापरयुग
संधि - ४०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X ४०० वर्षे)
१००० दिव्यवर्ष ( माणसांची ३६० X १००० वर्षे) - १ कलियुग
संधि - २०० दिव्यवर्ष
(माणसांची ३६० X २०० वर्षे)
४ युग - १ चौकडी (१२००० दिव्यवर्ष - ३६० X १२००० = ४३,२०,००० मानवी वर्ष)
७१ चौकड्या - १ मन्वंतर (मन्वंतरात इंद्र, मनु व सप्तर्षी बदलतात व नवे निर्माण होतात.)
७१ X ३६० X १२००० = ३०६७२०,००० मानवी वर्षे
१४ मन्वंतरे - ब्रह्मदेवाचा १ दिवस (सृष्टीनिर्मिती) - १ कल्प
१४ X ३०,६७,२०,००० = ४,२९,४०,८०,००० मानवी वर्षे
१४ मन्वंतरे - ब्रह्मदेवाची १ रात्र (सृष्टीसंहार)
ब्रह्मदेवाच्या ३६० दिनरात्री - १ ब्रह्मवर्ष
ब्रह्मदेवाचे आयुष्य - १०० ब्रह्मवर्ष
१०० ब्रह्मवर्षे - १४ भुवन ब्रह्मांडांचा
(सप्तपाताळ, सप्तस्वर्गासहित भूलोक) नाश होतो - महाप्रलय, यावेळी ब्रह्मदेव ब्रह्मलोकातील इतर मुक्त जीवांबरोबर भगवंतामध्ये विलीन होतात.
अशी अनंत ब्रह्मांडे या विश्वात आहेत. त्यांचे स्वामी अनंत ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत.
महाविष्णूच्या नाभीकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाविष्णूच्या एका श्वास घेण्याने ब्रह्मांडे निर्माण होतात.
महाविष्णूच्या एका श्वास सोडण्याने ब्रह्मांडे नाश पावतात.
१०० ब्रह्मवर्ष - विष्णूचा १ दिन
१०० ब्रह्मवर्ष - विष्णूची १ रात्र
२०० ब्रह्मवर्ष - विष्णूची १ अहोरात्र
विष्णूच्या ३६० अहोरात्री - विष्णूचे १ वर्ष
विष्णूचे आयुर्मान - २०० विष्णूवर्षे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३०० विष्णूवर्षे - शिवाचा १ दिन
३०० विष्णूवर्षे - शिवाची १ रात्र
६०० विष्णूवर्षे - शिवाची १ अहोरात्र
शिवाच्या ३६० अहोरात्री - १ शिववर्ष
शिवाचे आयुर्मान - ३०० शिववर्षे
माणसाला मोजताही येणार नाही अशा काळाचे असे हे संसारचक्र फिरत राहाते.ह्या कालमानाचा नुसता विचार केला तरी धडकी भरते. यात मनुष्याचे किती जन्म झाले, किती होणार याचा विचारही करवत नाही. माणूस परमेश्वरी शक्तिपूढे केवढा नगण्य आहे ते जाणवते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ :-
http://anusandhan.org


Share this link
प्राचीन कालगणना Button-isharealink

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum