सुरमईचे कालवण

Go down

सुरमईचे कालवण Empty सुरमईचे कालवण

Post  Admin on Fri 01 Apr 2011, 2:04 pm

साहित्य :
१ मध्यम सुरमई, १+१/२ टीस्पून मिरची पावडर, ४-५ ओल्या मिरच्या, ७-८ पाने कढीपत्ता, १/४ टीस्पून हळद, १+१/२ टीस्पून मीठ, ४-५ कोकम (आमसुले ), १+१/२ टेबलस्पून तेल.

वाटण मसाला :
१ वाटी सुके किंवा ओले खोबरे किसून, १०-१२ लसूण पाकळ्या सालासह, १+१/२ टीस्पून धणे, १/४ टीस्पून बडीशेप, मुठभर कोथिंबीर. ( सर्व एकत्र बारीक वाटावे. )

कृती :
सुरमईच्या तुकड्या धुवून त्याला हळद, मीठ, मिरची पावडर लावून ठेवावे. नंतर त्यात ओल्या मिरच्या
उभ्या लांब चिरून टाकाव्यात. तसेच कढीपत्ता, आमसुले व वाटलेला मसाला घालावा व सर्व एकत्र करावे. नंतर पसरट पातेलीत तेल थोडे गरम झाल्यावर गॅस मंद करून वाटण लावलेले मासे त्यात घालावेत व अलगद ढवळून त्यात एक वाटी पाणी ओतावे व मंद गॅसवर शिजवावे. शिजल्यानंतर गॅस बंद करावा. चमच्याने मासे ढवळू नयेत. तुकड्या मोडतील.

Admin
Admin

Posts : 62
Join date : 2011-03-22
Location : Pune

http://sampurnackp.co.cc

Back to top Go down

Back to top


 
Permissions in this forum:
You cannot reply to topics in this forum